Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याहेल्मेट सक्तीची कारवाई सुरु; समुपदेशनासाठी लागल्या रांगा

हेल्मेट सक्तीची कारवाई सुरु; समुपदेशनासाठी लागल्या रांगा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात दुचाकीस्वरांना हेल्मेट (Helmet) सक्ती करण्यासाठी ठिकठिकाणी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याद्वारे हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांना दोन तासांचे समुपदेशन (Counseling) करण्यात येत आहे. आज सकाळपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे…

- Advertisement -

शहरातील नागरिक फक्त पेट्रोल भरण्यापुरतेच हेल्मेट वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी नागरिकांनी हेल्मेट वापरावे यासाठी नवी युक्ती अवलंबली आहे.

यानुसार शहरात विविध ठिकाणी पथके नेमण्यात आले आहेत. या पथकांनी हेल्मेट परिधान न केलेल्या नागरिकांना पकडण्यास सुरुवात केली आहे.

विनाहेल्मेट नागरिकांची दुचाकी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस वाहनातून नाशिक फर्स्ट या मुंबई नाक्यावरील पोलीस समुपदेशन केंद्रांमध्ये दोन तासाचे समुपदेशन करण्यात येत आहे.

समुपदेशन पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येणार आहे. तरीदेखील हेल्मेट विना ती व्यक्ती दुचाकीवर पुन्हा आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त सिताराम गायकवाड (Sitaram Gaikwad) यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या