जलसंपदाची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री भुजबळ

जलसंपदाची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत(Water Resources Department ) दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा भूसंपादन (Daraswadi-Dongargaon Reach Canal Land Acquisition ) तसेच नाशिक पाटबंधारे विभागाकडील नाले दुरुस्ती, पूररेषा नियंत्रण, ओझरखेड कालवा चारी दुरुस्ती, विस्तारीकरण व पूल बांधणी, पालखेड डावा कालव्यावर एस्केप गेट बसवणे आदी कामे शेतकर्‍यांना प्राधान्य देऊन वेळेत पूर्ण करावीत.

तसेच ज्या कामांसाठी शासकीय पातळीवर मान्यतेची आवश्यक आहे त्या कामांबाबत कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यास शासन स्तरावर सर्वतोपरीने मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal )यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

जलसंपदा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समन्वयाने व नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात भूसंपादनाचा विषय येत असेल त्या ठिकाणी एकाही शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन दर निश्चित करण्यात यावा. ज्या ठिकाणी कामे चालू किंवा प्रलंबित आहेत अशा ठिकाणी प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी क्षेत्रीय भेट देऊन तेथील प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी नियोजन करावे.

गोदावरी डावा कालवा 25 नंबर चारी जऊळकेपासून मुखेडपर्यंत स्वतंत्र करावी, गोदावरी कालवा-चारी क्रमांक 3 मुखेड येथे पाणी मिळत नसल्याने दुरुस्ती करणे, पालखेड डावा कालव्यावर थेट विमोचक बसवणे तसेच ओझरखेड कालव्यातून खडक माळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 49 किलोमीटरमध्ये एस्केप गेट बसवणे या कामांचा प्रस्ताव तयार करून ही कामे लवकर सुरू करण्यात यावी.

तसेच रयत शिक्षण संस्था विंचूर येथे पालखेड डावा कालवा भूमिगत करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून हे कामही लवकरच सुरू करण्यात येईल. पुणेगाव-दरसवाडी कालवा किलोमीटर 1 ते 25 विस्तारीकरण आणि सदर कालव्यावरील वणी येथील बोगद्याच्या विस्तारीकरणाचे काम, पुणेगाव-दरसवाडी कालवा व दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे अपूर्ण काम यांत्रिकी विभागाकडून पूर्ण करणे, ओझरखेड कालवा दोन उन्हाळी आवर्तने देणे (खडकमाळेगाव), पालखेड डावा कालवा 111 कि.मी. मध्ये कालव्यावर सोनवणे वस्तीकडे जाण्यासाठी पूल बांधणे या कामांचा आढावा घेऊन पालकमंत्री भुजबळ यांनी कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, चांदवडचे प्रांताधिकारी सी.एस. देशमुख, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नाशिक लघुपाटबंधारे विभागाचे सचिन पाटील, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संगीता जगताप, जयदत्त होळकर, मोहन शेलार उपस्थित होते.

या प्रकल्पांचा आढावा

दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा काजीसांगवी, ता. चांदवड येथील भूसंपादन, नांदूरमध्यमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूररेषा निश्चित करणे, रुई, देवगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे या परिसरात नाल्यांच्या पाण्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी करावयाची कार्यवाही, देवगाव, रुई, कोळगाव, कानळद (देवगाव) गोदावरी कालवा 15 नंबर व नाला 7 नंबर मोर्‍यापर्यंत खोदकाम करून चर काढणे (पावसाचे पाणी), गोदावरी डावा तट कालवा साखळी क्रमांक 20500 ते 21300 मीटर. मध्ये विशेष दुरुस्ती व अंतर्गत कालव्यास अस्तरीकरण करणे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com