Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासमृध्दीचे काम डिसेबरअखेर पर्यंत पूर्ण करा

समृध्दीचे काम डिसेबरअखेर पर्यंत पूर्ण करा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा समृद्धी महामार्ग ( Samruddhi Express Highway) नाशिक मधून जात आहे. या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असली तरी देखील डिसेंबर अखेरपर्यंत याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील यंत्रणा तातडीने कामाला लागली असून याबाबत जिल्हाधिकारी गंगाधरण डी (Collector Gangadharan D)यांनी तातडीने बैठक घेत कामाचा आढावा घेतला आहेत.

- Advertisement -

या महामार्गाच्या कामाबाबत काही गावांमध्ये अडचणी असल्या तरी देखील त्या स्थानिक पातळीवर सोडवून लागलीच काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

गेल्या 2 महिन्यापूर्वीच या महामार्गाचा पहिला टप्पा खुल करण्याचा मुहूर्त टळला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांनी अनेकदा या महामार्गाची पाहणी केली.

७०१ किलोमीटरच्या या महामार्गापैकी सुमारे ५०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे यातील नाशिक जिल्हयातून १०० किलोमीटरच्या या महामार्गासाठी ८ हजार ३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. जिल्हयातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून हा महामार्ग जातो. १० जिल्हे आणि ३९२ गावांमधून जाणारा हा महामार्गामुळे राजधानी ते उपराजधानीचे अंतर सात तासांपर्यंत कमी होणार आहे.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे निर्णय रदद करतांना भाजप सरकारच्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम सध्या शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू आहे. त्यातीलच समृध्दी महामार्ग हा एक प्रकल्प. त्यामुळे आता ज्या ज्या जिल्हयांमधून समृध्दी मार्ग जातो त्या जिल्हयातील जिल्हाधिकारयांशी शिंदे यांनी चर्चा करत या महामार्गातील सर्व अडचणी, अडथळे दूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी गुरूवारी इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्याशी संयुक्त बैठक घेत चर्चा केली. दरम्यान येत्या आठवडाभरात जिल्हाधिकारी या मार्गाची पाहणी करणार आहेत.

ग्रामस्थांमुळे अडथळा

नाशिक जिल्हयातील एकूण तीन पॅकेजमध्ये हे काम सुरू आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात काही ठिकाणी कंत्राटदाराना ग्रामस्थ काम करू देत नसल्याच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. तर १० गटांची काही भागातील पुन्हा मोजणी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून त्यानूसार मोजणी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी भाउबंदकीच्या वादामुळे कामात अडथळे निर्माण केले जात असल्याच्याही तक्रारी आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या