Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजंक्शनआधी प्रस्तावित पार्किंग पूर्ण करा

जंक्शनआधी प्रस्तावित पार्किंग पूर्ण करा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामातून रविवार कारांजचे (ravivar karanja) वाटोळे आम्हाला करायचे नाही. शहराच्या स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा (Review of work) घेतला असता रविवार कारांजवर कोणतेही काम व्यावसायिकांना विश्वासात घेतल्याशिवाय करू देणार नाही. या कारंजाची गरज पार्किंगची (Parking) आहे. त्यामुळे बहुमजली पार्किंग (Multilevel parking) आधी करावी आणि मग या विकासकामाबद्दल व्यावसायिकांना विश्वासात घ्यावे, तरच काम करू दिले जाईल.

- Advertisement -

– प्रफुल्ल संचेती, कार्याध्यक्ष, नाशिक व्यापारी महासंघ

रविवार कारंजा ही मध्यवर्ती बाजारपेठ आहे. या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी वाहनांना पार्किंगची सुविधा द्यावी. त्यासाठी यशवंत मंडई येथे असलेले प्रस्तावित वाहनतळ उभारावे, त्यानंतर जंक्शन वगैरे करावे. जर वाहनतळाची समस्या संपली तर वाहतुकीला शिस्त लागणार आहे. तसेच उत्सवानिमित्त या ठिकाणी भरणारा बाजार गंगावाडी येथे न्यावा.

– नरेंद्र पवार, व्यावसायिक

सध्या तर ट्रायल रनसाठी ठेवण्यात आलेल्या गोण्यांमुळेच ट्रॅफिक होत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत जर रविवार कारंजा येथे विकासकामे होणार असतील तर व्यावसायिकांना विश्वासात घ्या. या ठिकाणी अधिकृत असे रिक्षाथांबा आहे, त्यांना विश्वासात घ्या. तसेच 103 वर्षांची परंपरा असलेला मानाचा चांदीचा गणपती उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो. जर बेट मोठे केले तर या सर्वांनी काय करायचे? रविवार कारंजाची मुख्य समस्या ट्रॅफिकची आहे. ती सोडवण्यासाठी प्राधान्याने यशवंत मंडई येथे वाहनतळ करायला हवे.

– संकेत पवार, सामाजिक कार्यकर्ते

अशोक स्तंभवरील सर्कल काढला आणि आता आर.के. वरील सर्कल मोठा का करता? किती गर्दी होते आहे आणि हिरावाडी रस्त्यावरील सिग्नल चालू न करता तो बंद ठेवला आहे अशी अनेक कामे आहेत की त्याचा काही उपयोग नाही. या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.

– ऋषिकेश क्षेमकल्याणी

सर्व चौक, रस्ते सजवा, पण त्याआधी पार्किंगची व्यवस्था करा.

– किशोर शेमाड

अहो, अख्ख्या शहरात नीट पार्किंगला जागा नाही.पण टोईंग कार्यक्रम जोरात आणि त्यात आता हे स्मार्ट सिटी, नाशिककरांना सहन करायची फार प्रॅक्टिस आहे, चुकीच्या ठिकाणी व्यक्त होणारच नाही.

– लतीफ पठाण

सर्कल छोटा असो वा मोठा प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे. कारण इथे प्रत्येकाला पहिले पुढे जायचे असते. त्या नादात वाहतूककोंडी होते.

– प्रभा वाघ

- Advertisment -

ताज्या बातम्या