Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअत्यावश्यक कामे पूर्ण करा - मनपा आयुक्त

अत्यावश्यक कामे पूर्ण करा – मनपा आयुक्त

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड विभागातील ( Nashikroad Division )आनंद नगर जॉगिंग ट्रॅक, राजमाता जिजाऊ स्विमिंग पूल,जेल रोड भाजी मार्केट, अमृत गार्डन व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील परिसराची पाहणी आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांनी करून त्या परिसरातील अत्यावश्यक व महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड विभागातील आनंद नगर नाशिकरोड जॉगिंग ट्रॅक येथील परिसरात भेट दिली. त्यावेळी आनंदनगर परिसरातील रहिवाशांशी आयुक्त रमेश पवार यांनी संवाद साधून त्यांना असणार्‍या अडचणी जाणून घेतल्या.

तसेच या ठिकाणी असणार्‍या जॉगिंग ट्रॅक लगतची खेळण्यांची दुरुस्ती व तेथील व्यायाम साहित्य, ग्रीन जिम त्वरित दुरुस्ती करून ते सर्वांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा सूचना बांधकाम विभागास देण्यात आल्या. या ठिकाणच्या मैदानात खेळणार्‍या खेळाडूंचा चेंडू वॉकिंग करणार्‍या नागरिकांना लागत असल्याच्या घटना घडतात त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी चेंनलिंग फेंसिंग करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.

राजमाता जिजाऊ स्विमिंग पूल बंद असून त्याची पाहणी करण्यात आली. या तरण तलावात चेहडी बंधार्‍यातून अथवा अन्य दुसर्‍या माध्यमातून पाणी आणून लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या ठिकाणी असणारा योगा हॉल,एक्झिबिशन हॉल,जीम सुरू करण्याच्या दृष्टीने त्वरित निविदा काढण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

नाशिकरोड येथील जेलरोड भाजी मार्केट व परिसराची पाहणी करण्यात आली. रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांना त्वरित महापालिकेच्या जेलरोड मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना मा.आयुक्त रमेश पवार यांनी विभागीय अधिकारी यांना दिल्या.अमृत गार्डन व परिसराची पाहणी यावेळी करण्यात आली. अमृत गार्डन सुशोभित करून त्याठिकाणी अद्यावत सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली तसेच पुतळ्याच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनपट या सारखे ऐतिहासिक लिखाण समाविष्ट करणे बाबत. आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित विभागास सूचना दिल्या. नाशिकरोड परिसरात झालेल्या पाहणीच्या वेळी आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या समवेत उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, विजयकुमार मुंढे, यांच्यासह शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता राजू आहेर,विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, उपअभियंता निलेश साळी,कुलकर्णी, पालवे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या