विनापरवानगी हळदी समारंभ; नवरदेवासह वडिलांवर गुन्हा

विनापरवानगी हळदी समारंभ; नवरदेवासह वडिलांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या (Sarkarwada Police Station) हद्दीत मल्हार खान (Malhar Khan) येथे एका व्यक्तीच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात (Marriage ceremony haldi program) विनापरवानगी वाद्य वाजवले जात होते. त्याठिकाणी पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता, त्यांनी परवानगी न घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत नवरदेवासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे....

तुळशीविवाहानंतर (Tulsi Wedding) विवाहसोहळे सुरु झाले आहेत. करोनाच्या लाटेनंतर (Covid outbreak) आता निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे जंगी विवाहसोहळ्यांना सुरुवात झाली आहे. मात्र, शहरात पोलिसांची परवानगी न घेतल्यास कारवाई होत असल्यामुळे लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद संतोष बुकाणे त्याच्या यांच्या हळदीच्या निमित्ताने वाद्य वाजवली जात होते. आवाज आल्याने सरकारवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व सेवकांनी त्या ठिकाणी जाऊन लग्नाचे वाद्य वाजविण्यासाठी आपण परवानगी घेतली आहे का ? असे विचारले.

दरम्यान, कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यावरून सरकारवाडा पोलिसांनी नवरदेव प्रसाद व त्यांचे वडील संतोष बुकाणे यांच्यासह वाद्य वाजवणाऱ्या सहा व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(complaint registered against eight person including groom and his father due to weeding)

त्यामुळे यापुढे लग्न असो किंवा कुठल्या समारंभ असो त्या ठिकाणी वाद्य वाचवायचे असेल तर पोलिसांची परवानगी आवश्यक आहे, असा संदेश पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com