Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासार्वजनिक ठिकाणी केक कापणे पडले महागात; मालेगावी एमआयएम आमदारावर गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी केक कापणे पडले महागात; मालेगावी एमआयएम आमदारावर गुन्हा

मालेगाव | प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक विजयाची वर्षपुर्ती सार्वजनिक ठिकाणी केक कापून जल्लोषात साजरी केल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे आ. मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह 10 जणांविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमास बंदी असतांना देखील आ. मुफ्ती यांनीच भर चौकात कार्यकर्त्यांसह जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केल्याने शहरातील जनतेत नाराजी व टिकेचा सूर उमटला होता…

- Advertisement -

शहरातील मुशावरत चौकात विजयाच्या वर्षपुर्तीचा केक कार्यकर्त्यांसह आ. मौलाना मुफ्ती यांनी कापून आनंदोत्सव साजरा केला होता.

कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी आ. मौलाना यांच्या स्मरणार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास प्रशासनाची बंदी असतांना त्याकडे दुर्लक्ष करत हा कार्यक्रम साजरा केला गेल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटला होता.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करत कार्यक्रम घेणे, रहदारीस अडथळा निर्माण करणे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ. मौलाना मुफ्ती यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेज, रिजवान खान, मो. अमीन फारूक, अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, अतहर अश्ररफी, खालीद सिंकदर, मसूद शाहीद, नियाज अहमद, नगरसेवक जाहीद आदी दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.नि. रविंद्र देशमुख हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या