शिवसेना नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शिवसेना नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई | Mumbai

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शिवसेना (Shivsena) पक्ष आनंदोत्सव साजरा करत आहे, तर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) ठिकठिकाणी आंदोलन (Agitation) केले जात आहे.

शिवसेना नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Womens T20 WC : भारतासाठी आज 'करो या मरो'चा सामना

ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी बुलढाणा (Buldhana) येथे पोलीस स्थानकात (Police Station) धाव घेत आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना (Police) निवेदन देत आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह शोधून द्या, नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शिवसेना नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे चोरीला गेल्याची तक्रार उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. आमचे चोरीला गेलेले चिन्ह आणि नाव पोलिसांनी तपास करून परत आणून द्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन (Agitation) छेडणार, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख लखन गाडेकर (Lakhan Gadekar) यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com