Commonwealth Games 2022 : महिला लॉन बॉल टीमने सुवर्ण पदकावर कोरलं नाव

ऐतिहासिक विजय!
Commonwealth Games 2022 : महिला लॉन बॉल टीमने सुवर्ण पदकावर कोरलं नाव

बर्मिंगहॅम |Birmingham

महिला लॉन बॉल संघाने (Woman Lawn Bowl Team) इंग्लंडच्या ( England) बर्मिंगहॅम (Birmingham) येथे 22 व्या कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय महिला टीमने (India Woman Team) इतिहास रचला आहे. लॉन बॉलमध्ये (Lawn Bowl) भारताने सुवर्णपदकावर (Gold Medal) नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाचा 17-10 च्या फरकाने पराभव करून भारतीय संघाने सुवर्ण पदक नावावर केले. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की यांच्या टीमने सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताने प्रथमच लॉन बॉलमध्ये भाग घेतला होता. 22 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) भारताच्या खात्यात आता एकूण 10 पदके आली आहेत.

कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games 2022) 92 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय लॉन बॉल (India Lawn Bowl) महिला संघाने पदक जिंकले आहे. लॉन बॉल्स स्पर्धेत यंदा सुरुवातीपासूनच भारतीय महिलांचा संघ कमाल फ़ॉर्ममध्ये होता. संघातील रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी कमाल कामगिरी केली.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये लॉन बॉल 1930 च्या सुरुवातीपासून खेळला जात आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, त्याने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत कधीच लॉन बॉलमध्ये पदक जिंकले नव्हते. पण आता इतिहासात प्रथमच भारताला या खेळात पदक मिळाले आहे. या स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे.

असा झाला सामना -

न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर होता. न्यूझीलंड संघाने लॉन बॉलमध्ये आतापर्यंत 40 पदके जिंकली आहेत. भारतीय संघाने न्यूझीलंडचा 16-13 असा पराभव करून प्रथमच कॉमनवेल्थ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com