Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिंदाल दुर्घटना चौकशीसाठी समिती

जिंदाल दुर्घटना चौकशीसाठी समिती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी (Igapturi )तालुक्यातील गोंदे येथील जिंदाल पॉलिफिल्म( Jindal Polyfilm Ltd) कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकार्‍यांना याबाबत लेखी आदेश वितरीत करण्यात आले. ही समिती या घटनेची चौकशी करुन जिल्हाधिकार्‍यांसह शासनाला अहवाल देणार आहे.

- Advertisement -

जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले होते. त्यातील 20 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. 5 जणांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची सखोल चौकशी अन् तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापणेचे आदेश खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिले होते. त्यानुसार 3 जानेवारीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापणार असल्याचे सांगितले.

दरम्यानच्या काळात समिती स्थापण्याबाबत कुठलिही प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे चौकशीही होऊ शकली नाही. आदेश देऊन तब्बल 7 दिवस उलटल्यानंतर आता कुठे मुहूर्त लागला असून, मंगळवारी सायंकाळी उशीरा समिती स्थापणेचे लेखी आदेश काढण्यात आले आहेत. त्यात प्रांताधिकारी, तहसीलदार, कामगार आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी फायर अ‍ॅन्ड सेफ्टी, आदी प्रमुख विभागांच्या अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. या घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला. तिघांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये मिळणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या