Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यावॉटर ग्रेसच्या चौकशीसाठी समिती गठीत

वॉटर ग्रेसच्या चौकशीसाठी समिती गठीत

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेतील वॉटर ग्रेस या ठेकेदार कंपनीकडून शहरातील सुरू असलेली सफाई व कामगारांकडून घेण्यात आलेल्या पैशावरुन मनपाच्या स्थायी समितीत गरमागरम चर्चा झाली. या कंपनीच्या कथित कारभारानंतरही प्रशासनातील अधिकारी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेत सभापती गणेश गिते यांनी वॉटर ग्रेस कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय देत जोपर्यत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यत कंपनीला बील देण्यात येऊ नये असा आदेश प्रशासनाला दिला.

- Advertisement -

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत समितीतील नऊ सदस्यांनी वॉटर ग्रेस कंपनीच्या कारभारासंदर्भात तीव्र आक्षेप घेत एक पत्र नगरसचिवांना दिले होते. या पत्राचे आजच्या स्थायी समिती सभेत नगरसचिवांकडून वाचन करण्यात आले. यात वॉटर ग्रेस कंपनीकडुन कामगारांकडून घेण्यात आलेल्या 15 हजार रुपयांंमुळे करारनाम्यातील अटीशर्थींचा भंग झाला असतांना प्रशासन संबंधीत ठेकेदारावर कारवाई का करीत नाही ? तेव्हा या कंपनीची चौकशी होत नाही तोपर्यत त्यांचे बिल अदा करु नये अशी मागणी या नऊ सदस्यांनी केली होती. या पत्रावर चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे कमलेश बोडके यांनी प्रशासनाला अनेक प्रश्न विचारत यातील गंभीरता सर्वासमोर आणली.

यावेळी घन कचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी नोटीस दिल्यानतंर कंपनीकडुन आलेल्या खुलाश्याची माहिती दिली. यात जे कामगार सोडून गेले असे 571 कामगारांना पैसे परत केले असल्याचे सांगितले. मात्र सद्या काम करीत असलेल्या 700 कामगारांना पैसे परत केले का ? याचे उत्तर डॉ. कुटे यांनी दिले नाही. मात्र जीपीएस यंत्रणा, गम बुट, हॅण्ड ग्लोज व इतर सुरक्षेसाठी कामगारांकडुन 15 हजार रुपये जमा करुन घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

बोडके यांनी अनेक गंभीर बाबी सभेत मांडत यातून सफाई कामगारांची कशी पिळवणुक सुरु आहे, याकडे सभापतींचे लक्ष वेधले. यानंतर प्रशासनातील काही अधिकारी कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत या प्रशासनाचे 2 अधिकारी व 2 स्थायी समिती सदस्य अशा समितीकडुन सखोल चौकशी करावी, चौकशी पुर्ण होईपर्यत त्यांना बिल अदा करु नये अशी मागणी केली. यावर सभापतींनी सदस्यांच्या भावना लक्षात घेत वॉटर ग्रेसची सखोल चौकशी प्रशासनातील 2 अधिकारी व 2 स्थायी समिती सदस्य अशा समितीकडुन करावी, पुर्ण चौकशी अहवाल येत नाही तोपर्यत त्यांना बिल अदा करु नये. तसेच हा चौकशी अहवाल कामगार उपआयुक्त कार्यालयाला पाठविण्यात यावा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

बोडके यांच्याकडून अनेक गौप्यस्फोट

स्थायी सदस्य कमलेश बोडके यांनी वॉटर ग्रेसच्या कामाबद्दल अनेक गौप्यस्फोट केले. यात कामगारांकडुन कंपनीने तयार करुन घेतलेल्या शपथ पत्राची कॉपी सभागृहात दाखविली. यात आम्ही स्वत:हून लिहुन देतो की, आम्ही 15 हजार दिलेले नाही. आमच्या कंपनीविरुध्द बदनामीचे षडयंत्र केले जात असुन यासंदर्भात आमची कोणतीही तक्रार नाही, असे या शपथपत्रात नमुद आहे. यावर 30 जणांची नावे असुन 10 जणांच्याच स्वाक्षर्‍या आहे. तसेच सभागृहात बोडकेंनी कामगारांनी पैशाबद्दल केलेल्या तक्रारी व कमी वेतन दिले जात असल्यासंदर्भातील मोबाईल संभाषणाचे रेकॉर्डींग सभेत ऐकविले.

सभापती गितेंंनी दिले असे निर्णय व निर्देश

* समिना मेेमन यांच्या मागणीवरुन मुस्लीम बांधवाच्या दफनभूमीसाठी झालेला ठराव रद्द केल्यासंदर्भातील चर्चेत जागेवर जाऊन पाहणी करुन यासंदर्भातील सविस्तर अहवाल पुढच्या सभेत सादर करा.

* स्मशान भूमीतील दीड एकर जागेवर अतिक्रमण झाले, याची पाहणी करुन कारवाई करा, असे निर्देश अतिक्रमण उपायुक्तांना दिले. तसेच वॉटर ग्रेसला नेमकी किती जागा दिली व प्रत्यक्ष किती जागेचा वापर केला जातो, यांची माहिती पुढच्या सभेत द्यावी.

* नगरसेवक राहुल दिवे व कल्पना पांडे यांच्या प्रभागातील स्वच्छता गृहांच्या दुरुस्तीसाठी शहर अभियंत्यांनी तात्काळ कारवाई करावी.

* मनपा शाळा दुरुस्तीसाठी प्रशासन अधिकारी व शहर अभियंता यांनी पाहणी करुन कामे मार्गी लावावीत. * डीटीआर घोटाळा चौकशी समितीची लवकरच बैठक घ्या.

* आकाशवाणी भाजी मार्केटजवळ रस्त्यावरील अतिक्रमण करणार्‍या भाजी विक्रेत्यावर कारवाई करावी व याठिकाणी सायंकाळी अतिक्रमण विभागाचे कर्मचार्‍यांची नियुक्ती करा.

* सहा विभागातील घंटागाडी ठेकेदारांना आत्तापर्यत किती दंड केला ? किती वाहने बंद आहे. याची माहिती पुढच्या सभेत ठेव

- Advertisment -

ताज्या बातम्या