पोलीस आयुक्तांची स्मार्ट रोडवर पाहणी

होर्डिंग्जची तपासणी
पोलीस आयुक्तांची स्मार्ट रोडवर पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहराचे विद्रुपीकरण थांबावे यासाठी पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबाबत आता कडक अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत . याचाच एक भाग म्हणून आज सायंकाळच्या सुमारास पोलीस आयुक्तांनी दीपक पांडेय Police Commissioner Deepak Pandey, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक आदींच्या उपस्थितीत स्मार्ट रोडवर स्वतः फिरून आढावा घेतला.

शहरात लागलेले होर्डिंग Hordings अधिकृत करण्याबाबत नियमावली तयार केली असून होर्डिंग्जवळ जाऊन स्वतः त्याचा प्रमाणित क्रमांक तपासात त्याचा मजकूर योग्य आहे का हे बघत पोलीस आयुक्तांनी इतर आधकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

यावेळी कमर्शियल होर्डिंगधारक देखील उपस्थित होते. होर्डिंगधारकांच्या परवानग्या सुलभतेने निर्गमित व्हाव्या यासाठी एक खिडकी लवकरात लवकर सुरु करण्याबाबत विनंती त्यांनी पोलीस आयुक्तांना दिली असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com