आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी फुटला महागाईचा बॉम्ब; LPG सिलेंडर २५० रुपयांनी महागला

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी फुटला महागाईचा बॉम्ब; LPG सिलेंडर २५० रुपयांनी महागला

दिल्ली | Delhi

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे (Petrol Diesel Price Hike) सत्र सुरुच आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या (LPG Cylinder) महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

मात्र ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच Commercial LPG Gas Cylinder Price Hike) झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी फुटला महागाईचा बॉम्ब; LPG सिलेंडर २५० रुपयांनी महागला
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५० रुपयांची वाढ झाल्याने मुंबईमध्ये १९ किलोग्रॅमसाठीचा हा दर आता २ हजार २०५ रुपयांवर पोहोचला आहे, याआधी दर १ हजार ९५५ रुपये होता. दिल्लीमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत २ हजार २५३ रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये (Petrol Diesel Price) कोणतीही वाढ करण्यात आली नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (Petroleum companies) आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी फुटला महागाईचा बॉम्ब; LPG सिलेंडर २५० रुपयांनी महागला
अनिल अंबानींनी 'या' दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले... काय आहे कारण?

या नवीन दरानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवस का होईना सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल -डिझेलच्या दरामध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे आता अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरीपार केली आहे.

Related Stories

No stories found.