Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून महाविद्यालये गजबजणार

आजपासून महाविद्यालये गजबजणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने Department of Higher and Technical Education करोनाचा corona प्रादुर्भाव कमी होत असल्याने महाविद्यालय colleges बुधवारपासून (दि.20) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली. महाविद्यालयातील वर्ग खोल्या व मैदानांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. दीड वर्षानंतर महाविद्यालये गजबजणार आहे.

- Advertisement -

महाविद्यालयातील वर्ग सुरू करतांना स्थानिक प्रशासनाशी विचारविनियम करून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना विद्यापीठांना राज्य शासनाने केल्या आहेत. महाविद्यालये, परिसंस्था व प्रशाळा सुरू करताना 50 टक्के किंवा त्या पेक्षा जास्त क्षमतेने सुरु करताना करोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेण्यात याव्यात.

राज्य शासनाने कोविड संदर्भात घेतलेले सर्व निर्णय जसेच्या तसे नाशिक जिल्ह्यामध्ये लागू करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कॉलेज सुरू करणे संदर्भातील हा शासन निर्णय सुद्धा आपल्या जिल्ह्यात जसाच्या तसा लागू होणार आहे. यामध्ये विद्यापीठे तसेच कॉलेजेसवर, प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात काही निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. त्या सर्वांचे परिपूर्णरित्या पालन करण्यात यावे असे संबंधितांना निर्देश आहेत.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक District collector Suraj Mandhare

दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश

महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिन्स्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 18 वर्षावरील ज्या विद्यार्थी व विद्यार्थींनींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी व विद्यार्थींनी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.

स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

करोनाची परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यातील पाहून महाविद्यालय सुरु ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात करोना संसर्ग कमी असल्याने महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालये

कला, वाणिज्य 80

व विज्ञान

एमबीए 22

एमसीए 5

एमई 9

एम फार्म 10

आर्किटेक्चर 3

बीई, बी.टेक 19

हॉटेल मॅनेजमेंट 1

बी. फार्म 25

फार्म डी 2

पॉलिटेक्निक 25

डी. फार्मसी 31

डीएचएमसीटी 1

एकूण 233

- Advertisment -

ताज्या बातम्या