२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू, असे असतील नियम


२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू, असे असतील नियम
महाविद्यालय

मुंबई

कोरोना काळात बंद करण्यात आलेली महाविद्यालये (college)उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळात (cabinet meeting)निर्णय घेण्यात आला. २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची मोठी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant)यांनी केली आहे.

महाविद्यालय
खडसेंच्या अडचणी वाढल्या : न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

दुसऱ्या डोसनंतर कॉलेजात यावे

महाविद्यालयात (college)येणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन डोस घेणं आवश्यक आहे.

  • ५० टक्के व त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यापीठाने निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानुसार नियम तयार करावे.

  • महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले पाहिजे. डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयाने पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करावे, त्याबाबात सूचना देण्यात आल्या आहेत.

  • ज्या परिसरात कोरोना अजूनही आहे त्याठिकाणी स्थानिक पातळीवरून महाविद्यालये सुरू करायचे की नाही याबाबत निर्णय घ्यावा. विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नियमावली जाहीर करावी. प्रत्येक ठिकाणी कुठली नियमावली लागू करावी, हे विद्यापीठाने ठरवावे.

  • ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांच्यासाठी महाविद्यालयाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

  • वसतीगृहांच्या संबंधित मोठा प्रश्न आहे. टप्प्याने वसतिगृह सुरू केले जाते. मात्र, वसतिगृहे सुरू करण्यापूर्वी त्याचा आढावा घ्यायचा आहे.

  • शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील कर्मचारी त्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले पाहजे. त्याचा अहवाल शासनाला पाठवावा.

  • दोन डोस ज्यांना घेतले आहेत त्यांनी महाविद्यालय परिसरात येताना कोरोना नियमांचे पालन करावे. ज्यांचे डोस पूर्ण झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेऊन महाविद्यालयात यावे.

Related Stories

No stories found.