Sunday, April 28, 2024
Homeजळगावphotos # मु.जे. महाविद्यालयाच्या "कंदिल"ने पटकाविला पुरूषोत्तम एकांकिका करंडक

photos # मु.जे. महाविद्यालयाच्या “कंदिल”ने पटकाविला पुरूषोत्तम एकांकिका करंडक

जळगाव jalgaon

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (Khandesh College Education Society) संचालित कान्ह ललित कला केंद्र (Canh Fine Arts Centre) व महाराष्ट्रीय कलोपासक पुणे (Maharashtrian Kalopasak Pune ) आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत (Purushottam Karandak Intercollegiate Singles Tournament) मु.जे. महाविद्यालयाच्या (M.J. college) कंदिल (Kandil”) या एकांकिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर औरंगाबादच्या (Aurangabad) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Government Engineering College) भानगड (Bhangad) या एकांकिने दुसरा क्रमांक तर चोपड्याच्या एम.जी.एस.एम. कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (M.G.S.M. of Chopda. College of Arts, Sciences and Commerce) पडदा (Padda) या एकांकीकेने तीसरा क्रमांक पटकाविला आहे.

- Advertisement -

स्पर्धेचा निकाल असा (कंसात एकांकिेचे नाव)

सांघीक पारितोषीके अशी :

सांघीक प्रथम : मु.जे. महाविद्यालय एकांकिका (कंदिल)

सांघीक द्वितीय : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (भानगड)

सांघीक तृतीय : एम.जी.एस.एम. कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा (पडदा)

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद (आम्ही सगळे)

वैयक्तिक पारितोषीके अशी

सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य : रचना किशोर अहिरराव कला, शास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा (भूमिका अनघा,एकांकिका पडदा)

सर्वोत्कृष्ट लेखक : अशित अशोक खरात शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (भानगड)

सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक : सिध्दांत सोनवणे (कंदील. मु.जे. महाविद्यालय जळगाव)

सर्वोत्कृष्ट सांघीक अभिनय नैपुण्य : प्रेरणा अमोल बडगुजर, कला, शास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा (भूमिका डॉक्टर,एकांकिका पडदा)

अभिनय नैपुण्य स्त्री : मयुरी धनगर प्रताप महाविद्यालय अमळनेर (भूमिका उमा, एकांकिका हायब्रिड)

अभिनय नैपुण्य पुरूष लोकेश मोरे ,मु.जे. महाविद्यालय जळगाव( भूमिका दाया एकाकिका कंदिल)

अभिनय उत्तेजनार्थ :

भाग्यश्री अमृतकर (कोवळी फुल)े डॉ. जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव,

वैष्णवी बाविस्कर : बत्ताशी पु.ओ. नाहटा भुसावळ.

गायत्री सोनवणे मु.जे. महाविद्यालय (कंदिल)

ज्योती पाटील मु.जे. महाविद्यालय जळगाव. (कंदिल)

गौरी चौधरी एम.जी.एस.एम. चोपडा (लज्जा द्यावी सोडून)

पियुष चौधरी गुलाबराव देवकर फार्मसी (बे्रन)

विशाल सानप नूतन मराठा महाविद्यालय जळगाव (बुजगावण)

शुभम धनगर एम.जी.एस.एम. चोपडा (लज्जा द्यावी सोडून)

गोविंद रेगे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (भानगड)

अक्षर ठाकरे प्रताप महाविद्यालय अमळनेर (भूमिका पंढरी , एकांकिका हायब्रिड)

शास्त्र शुद्ध शिक्षण महत्त्वाचे : अक्षय मुडावदकर

एखाद्या विषयात नैपुण्य मिळवण्याकरिता शास्त्र शुद्ध शिक्षण महत्त्वाचे असते त्यासाठी पाया भक्कम असला पाहिजे .शिक्षण हे यशाचे पहिले पाऊल असते.तेव्हा कुठलेही शास्त्र शिक्षण आधी शिका नंतर यश तुम्हाला नक्की मिळेल असे सुप्रसिद्ध कलाकार स्वामी समर्थ मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारे अक्षय मुडावदकर यांनी व्यक्त केले.

खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी संचालित  कान्ह ललित कला केंद्र व महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.

  यावेळी मंचावर अध्यक्षीय स्थान केसीई सोसायटी सदस्य प्रा. चारुदत्त गोखले,केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य संजय भारंबे, महाराष्ट्रीय कलोपासकचे राजेंद्र नागंरे,परिक्षक  सुनील नाईक ,सुशील सहारे,दिलीप जोगळेकर,प्रा.हेमंत पाटील  उपस्थित होते.

अक्षय मुडावदकर यांनी पुढे बोलताना सांगितले की,टाळ्या वाजवून स्वतःचे अभिनंदन करायला विसरू नका कारण ते साकारण्यासाठी तुम्ही मेहनत घेतलेली असते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शशिकांत वडोदकर यांनी पुरूषोत्तम करंडक पाच वर्षीय आढावा 2016-17 ते 2022 घेतला.सांस्कृतिक चळवळ रूजावा याकरिता आम्ही सतत प्रयत्न करू असे सांगितले.

परिक्षक सुनील नाईक यांनी आपल्या मनोगतात पॉज किती सहन करावा हा आम्हा परीक्षकांना शाप असावा असा नर्मविनोद केला.तसेच त्यांनी संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय शिंदे,हेमंत पाटील, वैभव मावळे, देवेंद्र गुरव,संजय जूमनाके व नाट्य शास्त्र विभागाच्या विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या