Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआनंदवार्ता : नाशिक जिल्हा 'म्युकरमायकोसिस मुक्त'

आनंदवार्ता : नाशिक जिल्हा ‘म्युकरमायकोसिस मुक्त’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकसाठी आनंदाची बातमी आहे. (Good news for Nashik) संपूर्ण जिल्हा पूर्णपणे म्युकरमायकोसिस मुक्त (Mucormycosis free) झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी दिली. आज मंगळवारी (दि.२८) एकही म्युकर मायकोसिसचा रुग्ण सापडला नाही….

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत ७८५ म्युकरमायकोसिस पाॅझिटिव्ह रुग्ण (Mucormycosis positive patients) सापडले होते. त्यापैकी ७०१ बरे झाले असून ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ५०१ रुग्णांचे ऑपरेशन करण्यात आले आहेत. यामध्ये कुणाचा डोळा, कुणाचे जबडे तर कुणाचा इतर काही भाग असे अवघड ऑपरेशन करून रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयात ०९ रुग्ण होते. तर महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत ४२३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. जीएच रुग्णालयात २४ रुग्ण बरे झाले. मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात ८ रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले.

तर सिव्हीलमध्ये ५५ रुग्णांनी उपचार घेतले. यासोबतच घोटी सिन्नर मार्गावर असलेल्या एसएमबीटी रुग्णालयात १०३ रुग्णांवर उपचार सुरु होते. तर मराठी विद्या प्रसारक समाजाच्या रुग्णालयात ७९ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या