जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांचा हेरिटेज वॉक

देशासाठी सैनिकांचे योगदान अमूल्यः गमे
जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांचा हेरिटेज वॉक

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असतांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे योगदान (Contribution of Soldiers) फार मोलाचे आहे.

वीर जवान व स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व सार्थ अभिमान व्यक्त करीत आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रामशेज किल्ला (Ramshej Fort) हेरिटेज वॉकचे (Heritage Walk) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने दिंडोरी (dindori) येथील तालुका प्रशासनाच्या वतीने ऐतिहासिक, पौराणिक वारसास्थळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर आज ‘हेरिटेज वॉक’ (Heritage Walk) चे आयोजन केले होते. हेरिटेज वॉक उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अपर आयुक्त भानुदास पालवे (Additional Commissioner Bhanudas Palve), स्वांतत्र्य सैनिकांचे वारस वीरपत्नी चंद्रभागा रंगनाथ चित्ते व मधुकर भाऊसाहेब मिसाळ हे उपस्थित होते.

रामशेज किल्ला हेरिटेज वॉक कार्यक्रमासाठी उपायुक्त रमेश काळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, प्रांताधिकारी डॉ. संदिप आहेर, निफाड प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, दिंडोरी तहसीलदार पंकज पवार, बागलाण तहसीलदार बबन काकडे, साहेबराव सोनवणे, नायब तहसिलदार, दिंडोरी गटविकास अधिकारी जीभाऊ शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह शासकीय विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) म्हणाले की, पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून पुर्ण देशात आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिंडोरी तालुका (dindori taluka) प्रशासनाच्या वतीने आज रामशेज किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे.

पौराणिक व ऐतिहासिक वारसास्थळ (Mythological and historical heritage site) असलेल्या या किल्ल्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम अयोजित केल्याबद्दल गमे यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. गमे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आपणास 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ हे अभियान राबवायचे आहे. नाशिक विभागात (nashik division) या अभियांनाचे उकृष्ट नियोजन झाले आहे. शासनाच्या निर्देशांचे परिपूर्ण पालन करीत आपण सर्वांनी हे अभियान यशस्वी करवयाचे आहे, असे आवाहनही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी नाशिककरांना केले.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ’हर घर तिरंगा’ अभियान राबवित आहोत. यात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत प्रत्येक घराघरात राष्ट्रध्वज (national flag) उभारायचा आहे. व्हाटसअ‍ॅप (whatsapp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) यासह इतरही माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या प्रोफाईल फोटोत (Profile photo) राष्ट्रध्वज ठेवायचा आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये व सर्व नागरिक यांनी उत्साहाने हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथन डी. यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी रामशेज किल्ला हेरिटेज वॉकसाठी (Ramshej Fort Heritage Walk) मनस्वी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्य सैनिक दिवंगत रंगनाथ अमृता चित्ते यांच्या वीरपत्नी चंद्रभागा रंगनाथ चित्ते व स्वातंत्र्य सैनिक दिवंगत भाऊसाहेब लक्ष्मण मिसाळ यांचे चिरंजीव मधुकर भाऊसाहेब मिसाळ या वारसांचा दिंडोरी तालुका (dindori taluka) प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी शाल व पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात केला.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व शासकीय अधिकारी यांनी हवेत तिरंगी फुगे सोडून रामशेज हेरिटेज वॉकला सुरवात करण्यात आली. या हेरिटेज वॉकला मोठ्या संख्येने अधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आज 75 वड व पिंपळ रोपांचे वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. आयोजित कार्यक्रमांच्या सुरवातीला जिल्हा परिषद शाळा जऊळके, दिंडोरी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत व स्वातंत्र्य गीत सादर केले.

दिंडोरीचे तलाठी विजय वाघ यांनी सुद्धा महाराष्ट्र गौरव गीत व अरुण इंगळे यांनी शिवगर्जना सादर केले. प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ संदिप आहेर यांनी करतांना कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी भास्कर कनोज यांनी आभार मानले. यावेळी रामशेज किल्ल्याची ऐतिहासिक माहिती दिंडोरी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 चे शिक्षक व ट्रेकर प्रवीण दळवी यांनी उपस्थितांना दिली. सुत्रसंचलन राजेंद्र उगले यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर व कर्मचारी व नागरिक यांनी रामशेज किल्याच्या मुख्य कमान पासून ते पायथ्यापर्यंत वॉक करत घोषणा दिल्या.

तिरंगा सिम्बॉल असलेले टी शर्ट व टोपी घालून सहभागी झालेले मान्यवर यांनी सर्व वातावरण तिरंगीमय केले होते. सर्कल अधिकारी भगवान काकड यांनी मोठा तिरंगी ध्वज हातात पकडून मान्यवरांसोबत आगेकूच केली. तेही लक्षवेधी होते. रामशेज किल्याच्या बाजूला मोठा तिरंगी ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महसूल विभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग, रामशेज शिक्षण संस्था पदाधिकारी, सेवक, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, सर्व विभागाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com