Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात 'इतक्या' गणेश मूर्तींचे संकलन, 'पाहा' आकडेवारी

नाशकात ‘इतक्या’ गणेश मूर्तींचे संकलन, ‘पाहा’ आकडेवारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या (NMC) वतीने मूर्ती आणि निर्माल्य संकलन केंद्राला मोठा प्रतिसाद मिळाला. रात्री 9 वाजेपर्यंत एक लाख ७७ हजारांहून अधिक मूर्ती संकलित झाल्या आहेत. सकाळी सहा वाजेपासून मूर्ती संकलनास सुरुवात झाली होती…

- Advertisement -

काल सुमारे १ लाख 77 हजार 403 मूर्तीं संकलन झाल्या असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. शहरातून एकूण किती निर्माल्य जमा झाले त्याची आकडेवारी मनपा आज जाहीर करणार आहे.

मनपाच्या नदी प्रदूषण रोखण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यंदा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न होते. त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या विसर्जन स्थळांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे.

मनपाच्या सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. ‘मिशन विघ्नहर्ता 2022 फिरता तलाव’ या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माल्य जमा करण्यासाठी के. के. वाघ कॉलेजच्या 300 विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेला मदत केली आहे.

विभागानुसार मुर्ती संकलन संख्या (वेळ सकाळी ६ ते रात्री ९)

  1. पंचवटी -: 63,626

  2. सिडको -: 17,606

  3. नाशिकरोड -: 5,0029

  4. नाशिक पश्चिम -: 10,485

  5. नाशिक पूर्व -: 10,546

  6. सातपूर -: 25,211

  7. एकूण -: 1,77403

…अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

विलास शिंदेंकडून मोदकांच्या प्रसादाचे वाटप

माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 51 हजार मोदकांचा प्रसाद विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशा भक्तांना वाटप केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या