Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादिवसाला एक कोटी वसुल करा; मनपाचे कर संकलन विभागाला 'टारगेट'

दिवसाला एक कोटी वसुल करा; मनपाचे कर संकलन विभागाला ‘टारगेट’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेचे (Nashik Municipal Corporation) घरपट्टी (house tax) थकबाकीच्या (arrears) दीडशे कोटी पैकी १११ कोटी वसूल झाले असून आयुक्तांनी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisement -

नोव्हेंबरचे नऊ दिवस व डिसेंबरचे ३१ दिवस असे एकूण चाळीस दिवसात चाळीस कोटी वसुली करण्याचे आव्हान कर संकलन विभागासमोर (Tax Collection Department) असून दिवसाला एक कोटी थकबाकी वसुली (Recovery of arrears) करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान कर संकलन विभागाला मनुष्यबणाची कमी असल्यामुळे त्याचा परिणाम वसुलीवर होताना दिसत आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात घरपट्टी (house tax) व पाणीपट्टी (water tax) प्रमुख स्त्रोत आहे. मात्र निवडणुकीचे (election) कामांमुळे बील वाटप व त्यांची वसुलीवर दिरंगाई झाली होती. त्यामुळे थकबाकीचा आकडा दीडशे कोटींवर पोहचला होता. वेळोवेळी आव्हान करुनही थकबाकीदारांनी पाठ फिरवल्याने अखेर कर संकलन विभागाने प्रथम थकबाकीदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केली.

तरी देखील थकबाकीदार जुमानत नसल्याने मागील १७ आॅक्टोबरपासून एक लाखांहून अधिक रक्कम थकित असलेल्या आस्थापन, कार्यालये व नागरिकांच्या घराबाहेर ढोल बजाअो मोहीम सुरु केली. त्याची धास्ती घेत थकबाकी भरणा सुरु केला. पहिल्या पाच दिवसातच जवळपास चार कोटी इतकी थकबाकी जमा झाली. दिवाळीची (diwali) सूट वगळता ही मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली.

आतापर्यंत या मोहीमेतून दहा कोटी इतकी थकबाकी वसूल झाली आहे. आयुक्तांनी मागील आठवड्यात सर्व विभागाची बैठक घेत डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीचे उदिष्ट दिले आहे. अन्यथा सबंधित विभाग प्रमुखांना कारवाईला समोरे जावे लागेल असा इशारा दिला. १५० पैकी १११ कोटी वसुली जवळपास पूर्ण झाली आहे. अद्याप ३९ कोटी थकबाकी वसुली करण्याचे मोठे आव्हान कर संकलन विभागासमोर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या