Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाळजी घ्या! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

काळजी घ्या! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तर भारतात (North India) थंडीची (Cold) मोठी लाट आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra) ही जाणवणार आहे. मंगळवारी (दि.21) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (Nashik), धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon), नंदुरबार (Nandurbar), अहमदनगरसह (Ahmednagar) औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्यामध्ये रात्री थंडीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

उत्तर भारतात थंडीची मोठी लाट आली आहे. यामुळे मध्य प्रदेश, गुजरातमध्ये रात्रीचे तापमान सहा अंशाच्या खाली आले आहे. पुढील पाच ते सहा दिवस मध्य भारतातील सर्व राज्यात थंडी कायम राहिल.

मात्र, दि. २७, २८ व २९ डिसेंबर दरम्यान उत्तर भारत तसेच मध्य प्रदेश, छतीगड झारखंड, विदर्भ या भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. इतर ठिकाणी थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण राहिल व गारठा वाढणार आहे.

मंगळवारी (दि. 21) मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात कोरडे हवामान कायम राहील. मात्र, रात्री थंडी जास्त राहिल. कोकण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड ,ठाणे, पालघर कोरडे हवामान दिवसाचे तापमान जास्त राहील थंडी कमी राहील.

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

अकोला, वाशीम, बुलढाणा ,यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर ,भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर, गडचिरोली येथे कोरडे हवामान राहील.थंडीची लाट पुढील पाच ते सहा दिवस राहिल. तसेच डिसेंबरच्या शेवटी विदर्भाच्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या