
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
राज्यात पुढील दोन दिवसांत पुन्हा थंडीची लाट (cold wave) येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (Department of Meteorology) देण्यात आली आहे.
पुढच्या 48 तासांमध्ये थंडीची (cold) तीव्रता वाढणार आहे. किमान पारा 2 ते 4 अंशांनी खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१) सायंकाळनंतर नाशिक शहर (nashik city) व जिल्ह्यातही कमालीचा गारठा जाणवत होता.
देशाच्या उत्तरेत मागच्या काही दिवसांपासून हिमवृष्टी (snowfall) होत आहे. याच कारणामुळे पुन्हा थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 5-6 दिवसांमध्ये महाराष्ट्रात ढगाळ वातावरण (Cloudy weather) आणि काही प्रमाणात ऊनही वाढल्याने थंडीची लाट कमी झाली होती. मात्र,ती आता पुन्हा वाढणार आहे.