समोसा खाणाऱ्यांनो सावधान! चटणीत निघाले झुरळ; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ

समोसा खाणाऱ्यांनो सावधान! चटणीत निघाले झुरळ; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ

भऊर | वार्ताहर Bhaur

देवळा शहरातील एका स्विट्सच्या दुकानात नाश्ता करत असताना समोश्यात झुरळ निघाल्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणाची संबंधित नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून देवळा नगरपंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे....

समोसा खाणाऱ्यांनो सावधान! चटणीत निघाले झुरळ; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ
मामाच्या गावी आलेल्या भाचीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

शहरातील कळवण रोडवरील निरंजन सोसायटीच्या शॉप नं-१ मध्ये एक स्वीटसचे दुकान आहे. खुंटेवाडी (ता.देवळा) येथील चेतन भामरे हा युवक बुधवारी (दि.२७)देवळा शहरात असणाऱ्या कृष्णा सागर स्विट्समध्ये दुपारच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेला असता यावेळी समोसा खात असताना अचानक त्यामध्ये मेलेले झुरळ निघाले.

हे बघताच त्याला किळस येऊन मळमळ सुरू झाली. हा गंभीर प्रकार संबंधित दुकानदाराला सांगितला यावेळी तुमचे पैसे वापस घेऊन घ्या असे सांगत दुकानदाराने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण करत दुकानदाराला जाब विचारला. यादरम्यान नगरसेवक भूषण गांगुर्डे यांनी स्विट्स चालकाला स्वीट्सच्या परवान्याविषयी विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

यापूर्वी देखील असे गंभीर प्रकार घडले असुन जनतेच्या आरोग्याशी सर्रासपणे खेळ सुरु असून स्विट्स चालकाची बेफिकरी ग्राहकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

समोसा खाणाऱ्यांनो सावधान! चटणीत निघाले झुरळ; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ
Breaking News अंगावरून ट्रक गेल्याने महिलेचा मृत्यू ; दुचाकीस्वार गंभीर

नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबधीत स्विट्सवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक भूषण गांगुर्डे यांनी केली आहे.

देवळा नगरपंचायतीने तक्रारीची तात्काळ दखल घेत स्विट्सला नोटीस देत सदर ही बाब गंभीर असून त्याबाबत आपणावर योग्य ती कारवाई का करण्यात येऊ नये? तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून त्याकामी परवानगी घेऊनच व्यवसाय चालु करावा.. तोपर्यंत व्यवसाय बंद करावा अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात संबंधित स्विट्स चालकाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ न शकल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

समोसा खाणाऱ्यांनो सावधान! चटणीत निघाले झुरळ; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ
राज ठाकरेंची सभा होणारच; औरंगाबादला छावणीचे स्वरूप

मी नाश्तासाठी समोसा घेतला असता तो खातांना अचानक त्यामध्ये मेलेलं झुरळ आढळून आले. हे पाहताच किळस येऊन मळमळ सुरू झाली. हा प्रकार संबंधित दुकानदाराला सांगितला परंतु, दुकानदाराने विषय निपटवण्यासाठी आग्रह केला. मात्र, हा किळसवाना प्रकार आणखी दुसऱ्यांसोबत होऊ नये म्हणून देवळा नगरपंचायमध्ये लेखी तक्रार केली असून कडक कारवाई करण्यात यावी.

चेतन भामरे,तक्रारदार खुंटेवाडी

समोसा खाणाऱ्यांनो सावधान! चटणीत निघाले झुरळ; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ
ग्राहकांनो! मे महिन्यात बँकांना 'इतक्या' सुट्ट्या

अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. सर्रासपणे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. यापूर्वी देखील गंभीर आणि किळीसवाणे प्रकार घडले असून प्रत्येक वेळी तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र, काहीही फरक पडत नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाने या स्विट्सचा परवाना आहे की नाही हे तपासावे तसेच यासंदर्भात कडक कारवाई करावी अन्यथा स्विट्स कायमस्वरूपी बंद करावे.

भूषण गांगुर्डे, नगरसेवक देवळा

Related Stories

No stories found.