Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याकोरोना लसीचे कोविन (Co-Win) अ‍ॅप कधी करावे डाऊनलोड

कोरोना लसीचे कोविन (Co-Win) अ‍ॅप कधी करावे डाऊनलोड

नवी दिल्ली

कोरोना लसीकरण मोहीम शनिवार (ता.१५) पासून सुरु होत आहे. त्यासाठी कोविन (Co-Win) हे अ‍ॅप सरकारने तयार केले आहे. या अ‍ॅप कधी नोंदणी करावी, अ‍ॅप कधी डाऊनलोड करावे, यासंदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊ या.

- Advertisement -

कोविन (Co-Win) अ‍ॅप काय आहे

भारत सरकारने कोविन अ‍ॅप तयार केले आहे. त्याचा उद्देश कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवणे आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी लोकांनी नोंदणी करावी, यासाठी हे अ‍ॅप तयार केले आहे.

अ‍ॅप कसे करावे डाउनलोड

सध्या कोविन (Co-Win) अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाही. परंतु त्याचे अनेक नकली अ‍ॅप तयार झाले आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करुन लोकांना जागृत केले आहे. कोविन (Co-Win) लॉन्च झाल्यानंतर त्याची माहिती जनतेस देण्यात येणार आहे.

नोंदणी कधी होणार ?

कोविन अ‍ॅप जेव्हा कार्यन्वीत होईल, त्यानंतर लोकांना नोंदणी करता येणार आहे. सध्या या अ‍ॅपद्वारे फक्त आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण होत आहे. अ‍ॅपवर नोंदणीसाठी सरकारने मान्य केलेले आधार कार्ड, ड्राइविंग लायन्सन, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कॉर्ड, बँक पासबूक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेंशन प्रमाण पत्र लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या