सहकारी बँकांची कान टोचणी

आरबीआयच्या अहवालात व्यवस्थापनाच्या त्रुटींवर बोट
सहकारी बँकांची कान टोचणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

रिझर्व बँक ऑफ इंंडीयाने (Reserve Bank of India) नुकत्याच प्रसिध्द केलेल्या ट्रेंड्स अ‍ॅण्ड प्रोग्रेस ऑफ इंडीयन बँंकींग अहवालानुसार (Trends and Progress of Indian Banking Report) सहकारी बँकांच्या कामकाजामध्ये काही त्रुटी जाणवत असून

त्यात तंत्रज्ञान वापराचा अभाव, तरुण ग्राहक वर्गास आकर्षित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. बँकांच्या (bank) संचालक मंडळामध्ये तरुण सदस्यांची कमतरता व बँकेतील सेवकांमध्ये गुणवत्तेचा अभाव यासह व्यावसायिक दृष्टीने धोरणात्मक निर्णय होत नाहीत,असे आढळून आले आहे.

सध्या देशात व्यापारी बँकांची संख्या 12 असून ठेवी 85 लाख कोटीच्या आहत. खाजगी बँकांंची (private banks) संख्या 37 असून ठेवी 43लाख कोटी आहेत. परदेशी बँकांची संख्या 45 असून ठेवी सात लाख कोटी आहेत.प्रादेशिक बँका 45 असून ठेवी पाच लाख कोटी आहेत. सहकारी बँका 1919 असून सुमारे दहा लाख कोटीच्या ठेवी आहेत.

ट्रेंडस अँड प्रोग्रेस बँकिंग इन इंडिया नुसार सर्व प्रकारच्या अशा 2058 बँका 31 मार्च 2021 अखेर कार्यरत आहे. या मध्ये सहकारी बँकांच्या (Cooperative Banks) ठेवींचा वाटा हा फक्त 7 टक्के आहे. म्हणूनच आरबीआयला सहकारी बँकांच्या कामकाजामध्ये काही त्रुटी जाणवल्या आहेत. त्यात वरील पाच बाबीसह व्यवस्थापन व त्रुटी पूर्तता या दोन्ही क्षेत्रांसाठी जाणीवपूर्वक सुधारणा करण्याची आवश्यकता करण्याची सुचनाही केली आहे.धोका नियंत्रण किंवा रिस्क कंट्रोल व्यवस्थेची (Risk control arrangements) उभारणी करण्याची आवश्यकता सांगीतली आहे.

सायबर क्राईम वाढीच्या पार्श्वभूमीवर सायबर सिक्युरिटीवर (Cyber ​​Security) पुरेशी गुंतवणूक करण्याची सुचना केली आहे.आयबीआयला सहकारी बँकांपुढे काही आव्हाने व अडचणीही दिसल्या आहेत. त्यात बँकिंग व्यवसायातील बदल म्हणजेच ई-मेल, सर्व कार्ड्स व डीजीलायझेशन मोबाईल बँंकीगमुळे बँकेत जायची गरजच भासू नये,असे वतावरण अजुन बर्‍याच ठिकाणी तयार व्हायचे आहे.

बँकिंग,व्यवसायापुढे सर्वसाधारण तीन अडचणी आहेत.त्यात संचालकांचा वाढता हास्तक्षेप, सेवकांची कार्यक्षमता आणि थकबाकीदार कर्जदार,त्यानंतर राज्ये व केंद्रीय सहकार खात्याचे किचकट नियम, राजकीय दृष्टीकोनातून घेतले जाणारे कर्जमाफीचे नियम व त्यामुळे कर्जदारांंच्या मानसिकतेवर परिणाम होऊन चांगले कर्जदारही कर्ज फेडण्याकडे करत असलेले दुर्लक्ष, तसेच काही वेळा निसर्गनिर्मित म्हणजेच दुष्काळ (कोरडा किंवा ओला) याचा सहकारी बँकांच्या कारभारावर परीणाम होतो.या सर्वातून वाटचाल करत सभासदांचा, ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेऊन बँंक व्यवस्थित चालविणे एक मोठी कसरत झाली आहे.

आरबीआय ही सहकाराच्या बाजूनेच आहे. ती ठेवीदारांचा जास्त विचार करते, असे आवर्जुन जाणवते. म्हणून काही जणांना आरबीआयच्या सुचना जाचक वाटतात. मात्र आता टिकाव धरुन ठेवायचा असेल तर त्यात सुधारणा करण्याशिवाय तरणोपाय राहिलेला नाही.

- डॉ. प्रशांत पुरंदरेमाजी अध्यक्ष श्री समर्थ सहकारी बंँक व विद्यमान उपाध्यक्ष सहकार भारती नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com