Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Budget 2022 : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! राज्यात सीएनजी स्वस्त होणार

Maharashtra Budget 2022 : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! राज्यात सीएनजी स्वस्त होणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. यात सीएनजीबाबत (CNG) एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे…

- Advertisement -

सीएनजीचे दर (CNG Price) आता तब्बल साडेदहा टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. नैसर्गिक वायूवर साडे दहा टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आला आहे.

सीएनजी कर साडे तेरा टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात सीएनजी स्वस्त होणार आहे. तसेच नैसर्गिक वायुवरचा कर कमी केल्यामुळे आता पीएनजीदेखील स्वस्त होईल.

यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र पेटोल-डिझेलबाबत सरकारने कुठलीही कपात केली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या