Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात फेसबूक लाईव्हद्वारे साधणार जनतेशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात फेसबूक लाईव्हद्वारे साधणार जनतेशी संवाद

मुंबई | Mumbai

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (shivsena) काही आमदारांसह (mla) कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अल्पमतात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackery) संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत…

- Advertisement -

मुख्यमंत्री या लाईव्हमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडीवर त्यांची बाजू मांडणार असून ते राजीनामा देणार की एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार हे थोड्य़ाच वेळात स्पष्ट होणार आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ (narhari zirwal) यांना पत्र लिहले असून या पत्रावर शिवसेनेच्या ५५ पैकी ३४ आमदारांच्या सह्या असल्याने बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या