मला माझ्याच लोकांनी दगा दिला - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । Mumbai

शिवसेनेच्या (Shiv Sena) ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अडचणीत आले आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलावून ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठकीत त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे दीड वर्षांपासून केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

यावेळी ठाकरे म्हणाले की, तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद! आता जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊ. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली. हे दुर्देवी आहे. या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केले. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांनी आजच्या बैठकीत केले.

दरम्यान,आजच्या या बैठकीनंतर जयंत पाटील (Jayant Patil) माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांचे सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. इतर दोन्ही पक्षांनी चांगले सहकार्य केले म्हणून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच राजीनाम्याबाबत त्यांनी कोणतेही विधान केले नाही, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com