Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रआता दुकाने यावेळेपर्यंत सुरु राहणार; शनिवारसंदर्भातही निर्णय

आता दुकाने यावेळेपर्यंत सुरु राहणार; शनिवारसंदर्भातही निर्णय

सांगली

: कोरोना (Corona) आणि महापूर (Flood) या दोन्ही प्रश्नांवर जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी म्हटलं आहे. राज्यात दुकानांना (Shops) रात्री ८ वाजेपर्यंत (8pm) परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी केली आहे…

- Advertisement -

तसेच शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. सांगली दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यासंदर्भातील अध्यादेश संध्याकाळी काढण्यात आला. नगर जिल्हा वगळता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना सवलती मिळणार आहेत.

photo शाहारुख खान, चक दे इंडिया अन् सोशल मीडिया

राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण (Corona)संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर (GR) आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच दुकाने (shop)सुरू आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत. असं देखील त्यांनी सांगितलं.

पॅकेज जाहीर करणार नाही

नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे ते सर्व प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली जी निवेदने आहेत ती द्या त्यातील सूचनांचा नक्कीच विचार करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिली.

भिलवडी येथील पूरबाधितांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अंकलखोप येथील पूरग्रस्तांशी अत्मियतेने संवाद साधत, ‘शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे’ असल्याची ग्वाही अंकलखोपवासियांना दिली.

याप्रसंगी प्रांतअधिकारी मारुती बोरकर, तहसिलदार निवास ठाणे (पलूस) व कडेगाव तहसिलदार डॉ.शैलजा पाटील, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, महेंद्र लाड, नितीन बानगुडे – पाटील, भिलवडीच्या सरपंच सविता पाटील यांच्यासह भिवलडी व अंकलखोपचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या