Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रलॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार : असलम शेख यांचा दावा

लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार : असलम शेख यांचा दावा

मुंबई

राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यामुळे आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच लॉकडाऊनचा निर्णय घेतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. लॉकडाऊनची नियमावली तयार करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्राची नवीन गाईडलाईन? लॉकडाऊन कसा असणार?

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे भविष्यातील कोविड संसर्ग विस्फोट टाळण्यासाठी राज्य सरकार सलग काही दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या पवित्र्यात आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊनची नियमावली तयार करत आहे. हा निर्णय आजच जाहीर होणार असल्याचा दावा मंत्री असलम शेख यांनी केला.

लॉकडाऊनबाबत माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, आम्हाला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे, लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

थोरात म्हणतात, लॉकडाऊन १४ दिवसांचा

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, राज्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता १४ दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आज किंवा उद्या मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील. मुख्यमंत्री याबाबत अंतिम एसओपी करत आहेत. गरीब लोकांना काय दिलासा देता येईल याबाबत सरकार विचार करत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या