... तर आजपासून 'वर्षा' बंगला सोडणार - उद्धव ठाकरे

... तर आजपासून 'वर्षा' बंगला सोडणार - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० हुन अधिक आमदारांसह (mla) बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला...

यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून आपल्यासमोर बातम्या येत आहेत. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का ? शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे का? मुख्यमंत्री भेटत का नाही ? मुख्यमंत्री भेटत नव्हते. मुख्यमंत्री म्हणजेच मी गेल्या काही दिवसांपूर्वी हे सत्य होते, याचे कारण ती माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नंतरच्या दोन-तीन महिने मी कोणालाही शक्‍य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही, हा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केली आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय बोलणार. असे होते तर इथे बोलण्यात काय हरकत होती. सुरत जाण्याची काय गरज होती. मला कोणताही मोह नाही. खूर्चीला चिकटून बसणारा नाही. समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचे पत्र तयार ठेवतो. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहे. तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय.

पुढे ते म्हणाले की, ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुखपद सांभाळायला नालायक आहे, मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवे. मी शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. म्हणून एकदा ठरवू. समोर या, आणि सांगा. 'पद येत असतात जात असतात. मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे आले. संख्या कोणाकडे किती आहे हे माझ्यासाठी गौण आहे. मी ज्यांना माझे मानतो त्यापैकी किती माझ्याविरोधात मतदान करतील तर ही माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असेल. असेही ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, माझी पहिली कॅबिनेट मीटिंग हॉस्पिटलमध्ये ऑनलाइन केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन एकमेकांमध्ये गुंतलेले शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदू आणि हिंदूत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही आणि शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, म्हणूनच पंधरा दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अयोध्येला (Ayodhya) गेले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत व विधिमंडळात बोलणारा कदाचित मी पहिल्या मुख्यमंत्री असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, काहीजण शिवसेना बदलल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत कि, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, पण मी असे काय केले आहे ? बाळासाहेब २०१२ मध्ये वारले. २०१४ साठी आपण एकाकी लढत होतो. त्यावेळी आपण हिंदू होतो आणि आजही आहे. एकट्याच्या ताकदीवर प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले. आमदार झाल्यानंतर त्यातले काही नंतरचे मंत्री झाले हे सुद्धा शिवसेना बाळासाहेबांनंतरची शिवसेना होती. त्यानंतरच्या आतापर्यंतची वाटचाल आणि आता गेली अडीच वर्षे मी स्वतः मुख्यमंत्री असून माझ्यासोबत मंत्रिमंडळातील सहकारी ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेमधील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com