CM Uddhav Thackeray Live मराठा आरक्षणावर पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा

CM Uddhav Thackeray Live मराठा आरक्षणावर पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा
CM udhhav Thackeray

मुंबई :

आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्ग दाखवला आहे. आता पंतप्रधान, राष्ट्रपतींनी यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना सांगितले.

CM udhhav Thackeray
सुप्रीम कोर्टाने म्हटले, ५० टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी वैध आधार नव्हता

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत निकाल देताना सुप्रिम कोर्टाने आपल्याला मार्गदर्शन केले आहे. यावर केंद्र सरकार आणि राष्ट्रपती घेऊ शकतात असे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. या विषयावर आम्ही सगळे पक्ष एकत्र आहोत, आम्ही एकमुखी विनंती करत आहोत की केंद्र सरकारनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. यासंदर्भात मी उद्याच पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. वेळ पडल्यास त्यांची भेटीही घेईल.

मराठा समाजाने आतापर्यंत जसा संयम दाखवला तसाच यापुढे दाखवावा. मराठा समाजाचे नेते संभाजीराजे यांनी देखील समंजसपणाची भूमिका घेतली,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उच्य न्यायालयात ज्या वकिलांनी आपल्याला विजय प्राप्त करून दिला त्याच वकिलांनी सर्वोच्य न्यायालयात बाजू मांडली. या वकीलांच्या सोबत आणखी उत्तम वकील िदले.

कोरोनावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे. रु्ग्णसंख्या ओसरली नाही पण रुग्णवाढ स्थिरावली आहे. जर निर्बंध लावले नसते तर महाराष्ट्रात साडेनऊ ते दहा लाख रुग्ण असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अजूनही काही दिवस निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहे. सध्या गरज असली तरी तरी लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com