cm uddhav thackeray live : ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत मागितली

cm uddhav thackeray live : ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत मागितली
लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. राज्यातील ऑक्सिजनची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांकडून हवाईदलाची मदत मागितली आहे. यामुळे देशभरातून कुठून ऑक्सिजन आणणे सोपे होणार आहे.

गेल्या वर्षीही आपण पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा म्हणालो होतो की पुढचा गुढी पाडवा कोविडमुक्त असू दे. मधल्या काळात तशी परिस्थिती आपण नक्कीच निर्माण केली होती. फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवर नियंत्रण मिळवले होते. जिंकत आलेल्या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळत नाहीयेत. रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढली आहे. काही कारखान्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा देखील करायला सुरुवात केली आहे. पण इतर कंपन्यांकडून ऑक्सिजन आपल्या राज्यात आणणं कठीण आहे.

Title Name
उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून पुढचे १५ दिवस राज्यात संचारबंदी
लॉकडाऊन

मुख्यमंत्र्यांचे भाषणातील मुद्दे

-नैसर्गिक आपत्तीचे निकष लावावेत. त्यामुळे ज्यांची रोजी रोटी बंद झाली आहे, त्यांना मदत करण्याची शक्यता निर्माण होईल. ती मदत द्यावी.

-सार्वजनिक वाहतूक सेवा चालू राहतील, बस आणि लोकलसेवा सुरूच राहणार आहेत.

-कोरोनाचा सामना करण्यासाठी ब्रिटन प्रमाणे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे लागणार

-कोरोना व्हायरस : आता उणीदुणी काढत बसू नका, अन्यथा महाराष्ट्र माफ करणार नाही

-कुणाला मदत करायची कोरोनाला, की कोरना विरोधात लढणाऱ्या सरकारला, हे जनतेनेच ठरवायचे आहे

-जीएसटी परताव्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी

-हॉटेल रेस्टॉरंट्सवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील

-पुढील एक महिन्यासाठी गरिब लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देणार

-गोर गरिबांना शिवभोजन थाळी एक महिना मोफत देणार

-निर्बंधांच्याकाळात आरोग्य सुविधांकरिता स्थानिक प्रशासनासाठी ३ हजार ३०० कोटी निधी बाजूला काढला आहे

-रुग्ण वाढ अशीच राहिली तर रेमडिसिवीरची आवश्यकता दुप्पट होणार

-

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com