CM Uddhav Thackeray Live राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवले

CM Uddhav Thackeray Live राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवले

लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवले आहे. काही निर्बंध जिल्ह्यानुसार कठोर होतील. काही ठिकाणी सुट मिळेल.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या पालकांचे पालकत्व सरकार घेईल. त्यासाठी एक योजना तयार करत आहोत. ती लवकरच जाहीर करु.

महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. आपण गाव, तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त झाले तर देश कोरोनामुक्त होईल.

कोराना मुक्त गाव ही मोहीम राबवावी. प्रत्येक गाव कोरानामुक्त झाले तर तालुका व जिल्हा कोरोनामुक्त होईल. पोपाटराव पवारांनी व इतर दोन तरुण सरपंचांनी आपले गाव कोरोनामुक्त केले.

दहावीच्या परीक्षेचा निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या परीक्षेचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी देशाचे एक धोरण असायला हवा. पंतप्रधानांना मी त्यासाठी पत्र लिहिणार आहे.

लसीकरणाची जबाबदारी घेण्यास महाराष्ट्र तयार आहे. १८ + वयोगटातील नागरिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करु. लसींचा पुरवठा जूनपासून सुरळीत होणार आहे. राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे.

तिसरी लाट आली तर आपल्याला फार कठीण जाईल. त्यामुळे फार काळजी घ्यावं लागणार आहे. कारण ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील बालरोग तज्ज्ञांची समिती तयार केली.

माझा डॉक्टर ही संकल्पना राबवणार आहे. त्यात फॅमिली डॉक्टरने कोव्हिड, नॉन कोव्हिड रुग्ण ओळखायची आहे.

जी जनता आपल्याला आपले मानते त्यांच्यावर बंधने लादणे यापेक्षा कटू काम कोणतेही असू शकत नाही. कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे.

मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मागील दीड वर्षांपासून तुम्ही काही बंधनं पाळत आहात. या बंधनांचा परिणाम आता दिसतो आहे.

Related Stories

No stories found.