Tuesday, May 14, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांनी बोलावली मविआच्या आमदारांची बैठक

मुख्यमंत्र्यांनी बोलावली मविआच्या आमदारांची बैठक

मुंबई | Mumbai

राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha elections) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून ते मंगळवारी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीला काही अपक्ष आमदाराही उपस्थित राहण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

भाजपने (BJP) तीन उमेदवार (Candidates) दिल्यामुळे सहाव्या जागेसाठी चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shivsena) आता आपले सर्वस्व पणाला लावले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मतदानाआधी सर्व आमदारांशी स्वतः संवाद साधणार आहेत. आमदार फुटू नयेत यासाठी सर्व आमदारांना १० तारखेपर्यंत एकत्र ठेवले जाणार आहे.

तसेच शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) ठेवण्यात येणार असून या आमदारांवर शिवसैनिक नजर ठेवणार आहेत. तर शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सर्व आमदारांना विश्वास देतील, भाजप (BJP) कसे राजकारण करत आहे, आपण कसे जिंकणार आहोत हे मुख्यमंत्री आमदारांना पटवून देणार आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॅाटेलवर घेऊन जाण्यात येईल.

असे आहे पक्षीय बलाबल

सत्ताधारीपक्ष संख्याबळ

शिवसेना – ५५

राष्ट्रवादी – ५३

काँग्रेस – ४४

बहुजन विकास आघाडी – ३

समाजवादी पार्टी – २

प्रहार जनशक्ती पार्टी – २

माकप – १

शेकाप – १

स्वाभिमानी पक्ष – १

क्रांतिकारी शेतकरी पार्टी – १

अपक्ष – ९

सत्ताधाऱ्यांकडे एकूण संख्याबळ – १७२

विरोधीपक्ष संख्याबळ

भाजप – १०६

जनसुराज्य शक्ती – १

राष्ट्रीय समाज पक्ष – १

अपक्ष – ४

विरोधकांकडे एकूण संख्याबळ – ११२

- Advertisment -

ताज्या बातम्या