22 दिवस उपचारानंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray)शस्त्रक्रिया केली. चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
स्वयंपाकानंतर टीव्ही पाहणेही महागले, जाणून घ्या आजपासून झालेले बदल

10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. आज 22 दिवसांनी ते घरी परतले आहेत. मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिला त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते.

रुग्णालयात असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com