मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना हे भावनिक आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेFile Photo

मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना हे भावनिक आवाहन

मुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांनो (ST Workers)तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे, असे ‌‌भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers)केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com