उद्धव ठाकरे -नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार

उद्धव ठाकरे -नारायण राणे
उद्धव ठाकरे -नारायण राणे

सिंधुदुर्ग :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी मुख्यमंत्री नारायण राणे लवकरच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बऱ्याच वर्षानंतर हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे यामुळे ते काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्गमधील बहुचर्चित चिपी विमानतळाचे २३ जानेवारीला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पूर्वी शिवसेनेत असलेल्या नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे वाद संपूर्ण राज्याला माहिती आहेत. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पूत्र निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतात. तर शिवसेनेचे नेतेदेखील राणेंना प्रत्युत्तर देतात. अशा परिस्थितीत ठाकरे आणि राणे एकाच मंचावर एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com