Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रआता वर्ष झाले...पण अनेक जण डोळे लावून बसले होते

आता वर्ष झाले…पण अनेक जण डोळे लावून बसले होते

मुंबई

२८ नोव्हेबरला सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलेच… हे चालणारच नाही. असे करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केले. या काळात अनेकजण डोळे लावून बसले होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. करोना परिस्थिती आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”रहदारी सुरू झाली आहे. येणं जाणं सुरू झालं आहे. पण कुटुंबप्रमुख म्हणून सावध रहा सांगत राहणं हे माझं कर्तव्य आहे. मार्चपासून राज्यात करोनाचे रुग्ण दिसायला लागले. त्याची वाढ कशी झाली. याची आठवण करून देण्याचं कारण आता हिवाळा आलेला आहे. पावसाळा व उन्हाळ्यात साथी पसरल्या नाहीत. पण, आता रहदारी वाढल्यानंतर थंडीतील आजार दिसू लागले आहेत.

अजून सहा महिने मास्कच

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितल आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते ६ महिने तरी मास्क लावावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव आला आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन केलं. सावध रहा हे सांगण कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

लग्नात सावधानता बाळगा

मुख्यमंत्री म्हणाले की, लग्नसराई सुरू झाली की ‘यायच हं!’ असे आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. माता भगिनींना परत सांगतो, आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या