लॉकडाऊन वाढणार की हटवणार? मुख्यमंत्री आज साधणार संवाद

लॉकडाऊन वाढणार की हटवणार? मुख्यमंत्री आज साधणार संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच राज्यातील लॉकडाऊन (Lockdown in State) १ जून रोजी संपत आहे. यामुळे लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध आणखी शिथील करणार यासंदर्भात राज्यातील जनतेला उत्सुक्ता आहे. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) याबद्दल अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. आज रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
खाद्यतेल का महाग होत आहे ? जाणून घ्या कारण

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुण्यासह अनेक शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात काल दिवसभरात २० हजार २९५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार १ जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील, अशी शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील.

Related Stories

No stories found.