Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक महापूजा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक महापूजा

पंढरपूर । Pandharpur

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली…

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) (Murali Bhagwan Navale) व जिजाबाई मुरली नवले (४७) (Jijabai Murali Navale) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) हे सपत्नीक उपस्थित होते. शिवाय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी याच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) काही अटी व शर्तींवर संमती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होण्याचा मार्ग मोकळा झाला. काल रात्री उशिरा पंढरपूर (Pandharpur) येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या