मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट; 'हे' आहे कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट; 'हे' आहे कारण

मुंबई | Mumbai

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (MNS chief Raj Thackeray) शिवतीर्थ (Shivtirth) निवासस्थानी जाणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे...

यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबियांनी घरी गणपती (Ganapati) बसवला असून गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आज संध्याकाळी ४ वाजता राज ठाकरेंच्या दादर (Dadar) येथील निवासस्थानी पोहचतील. शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. राज्यातील सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता.

राज ठाकरेंकडे आक्रमक हिंदुत्वाची विचारसरणी आणि बाळासाहेबांचा वारसा या दोन्ही गोष्टी असल्याने शिंदे गट (Shinde Group) मनसेत विलीन होऊ शकतो असा पर्याय पुढे आला होता. अद्याप हे प्रकरण कोर्टात असल्याने यावर कुणीही अधिकृत भाष्य करत नसले तरी शिंदे गटाच्या आमदारांकडून (MLA) राज ठाकरेंचे होणारे कौतुक हे राजकीय चर्चेसाठी पुरेसे कारण ठरले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com