मुख्यमंत्री शिंदे ५० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; 'हे'आहे कारण

मुख्यमंत्री शिंदे ५० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; 'हे'आहे कारण

मुंबई | Mumbai

तीन महिन्यांपूर्वी सुरत व्हाया गुवाहाटी मुक्कामुळे राज्यातील सत्तासंघर्षाला ( Power Struggle) वेगळे वळण मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार असल्याचे समजते...

अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by-election) शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) माघार घेण्याची नामुष्की ओढवली होती. त्यातच आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाने सावध सुरुवात केली आहे.

याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व ५० आमदारांसहित (MLA)पुन्हा गुवाहाटीला (Guwahati) जाणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या सर्व ५० आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाऊन कामख्या देवीचे (Kamakhya Devi) दर्शन घेणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com