मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा; 'हे' आहे कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा; 'हे' आहे कारण

शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडल्यामुळे खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हे प्रकरण न्यायालयात (Court) असल्यामुळे याचा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांची (MLA) निवडणूक आयोगासमोर (Election Commission) ओळख परेड करणार असून ते लवकरच सर्व आमदारांना घेऊन दिल्लीला जाणार आहे.

दिल्लीत (Delhi) गेल्यानंतर हे सर्व आमदार आम्ही स्वतच्या मर्जीने एकनाथ शिंदेंसोबत आहोत, असे शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांना प्रश्नही विचारू शकतात. तसेच याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र निवडणूक आयोगाला दिले आहे.

दरम्यान, शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. यातच आता निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचे सांगण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com