Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याबाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच; गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचे ट्विट

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच; गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचे ट्विट

मुंबई l Mumbai

आषाढी एकादशीपासून (Ashadi Ekadashi) सुरू झालेल्या चातुर्मासातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा (Guru Pornima). हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरूला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंशी (Balasaheb Thackeray) प्रतारणा नाहीच, असंही म्हटलं आहे. या ट्वीटची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन. याबरोबरच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचा फोटोही शेअर केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांसोबत बंड पुकारलं आणि त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात सत्तांतर झालं असून उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर सतत टीका होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या