
मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या सर्व खासदार आणि आमदारांसह (MP and MLA) काल कामाख्या देवीचे (Kamakhya Devi) दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला (Guwahati) गेले होते. त्यानंतर आज ते मुंबईत (Mumbai) दाखल झाले असता माध्यमांशी संवाद साधला...
यावेळी शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीला या राज्यावरील अरिष्ट दूर कर, राज्यातला बळीराजाच्या जीवनात चांगले दिवस येऊ दे. राज्यातल्या जनतेला सुखी, समृद्ध, आणि आनंदी कर यासाठी देवीकडे प्रार्थना केली. तसेच राज्यात उद्योगांची (Industries) भरभराट होऊ दे, मोठ-मोठे उद्योग येऊ दे, तरुणांच्या हातात काम येऊ दे, तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, अशाप्रकारची प्रार्थना कामाख्या देवीकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, आसाममध्ये (Assam) कामाख्या देवी परिसरात महाराष्ट्र सदनासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा (CM Himanta Biswa) यांनी जागा देऊ केली आहे. आम्ही कामाख्या देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील लाखो भक्त कामाख्या देवीला जातात. त्यांची राहण्याची सोय होईल. त्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी आसाममध्ये महाराष्ट्र भवन निर्माण होईल. तिथे जागा देण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे शिंदेंनी सांगितले.