Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याहोय मी कंत्राटी मुख्यमंत्री...; एकनाथ शिंदेंची विधानसभेत चौफेर फटकेबाजी

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री…; एकनाथ शिंदेंची विधानसभेत चौफेर फटकेबाजी

मुंबई | Mumbai

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस-राष्ट्रवादीच आपला शत्रू, त्यांना जवळ करण्यापेक्षा मी माझे दुकान बंद करेन. आम्ही भाजपा-शिवसेना युती म्हणून निवडणूक लढवली. बहुमत मिळाले त्यानंतर अनैसर्गिक आघाडी केली. असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला आहे…

- Advertisement -

आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत (Vidhansabha) महत्वाचे निर्णय घेत आपल्या भाषणावेळी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासाचे कंत्राट घेतले आहे, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट घेतले आहे. गोरगरिब जनतेचे अश्रू दूर करण्याचे कंत्राट घेतले आहे.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे कंत्राट घेतले आहे. बहुजनांच्या हितासाठी कंत्राट घेतले आहे. असंगाशी विसंगती करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा असेही शिंदेंनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, आम्ही गद्दार असतो तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. आम्ही घेतलेली भूमिका ही लोकांना पटली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्यांच्याशी फारकत घेतली. आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची आवश्यकता नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

तसेच काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीवर बोलतांना ते म्हणाले की, ज्यावेळेस तुमचे लोक पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते त्यावेळेस आमचे लोक होते का? आमचे लोक घोषणा देत असताना तुमचे लोक पुढे गेले. त्यावेळी अमोल मिटकरी (Amol Mitkari) आले आणि कळ काढायला लागले असेही शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, केवळ वैचारिक दिवाळखोरीतून हिणवणे हेच उद्योग सुरू आहे. प्रत्येकाने मर्यादा सांभाळली पाहिजे. आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ. माझ्याकडे पण टँलेट आहे. माझ्या कलागुणांना कधी व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही. तुम्ही गपचुप जायचे. कानात सांगायचे. एकदा बोलणं झालं की संपलं असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या