बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांनी सरकार चालवणार - मुख्यमंत्री

बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांनी   सरकार चालवणार - मुख्यमंत्री

मुंबई । Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिंदे सरकारच्या (Shinde government) बहुमत चाचणीसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते. त्यानंतर आजपासून अधिवेशन सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Speaker of Legislative Assembly) प्रक्रिया पार पडली...

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून (bjp) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना तर महाविकास आघाडीकडून (mahavikas aaghadi) राजन साळवींना (rajan salvi) उमेदवारी देण्यात आली होती. यात राहुल नार्वेकर यांचा विजय झाला असून त्यांना १६४ मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते पडली. तसेच शिवसेनेचा पक्षादेश झुगारून बंडखोर आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्याने सरकारच्या वतीने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, आज राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार (Shiv Sena-BJP government) स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चालले आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासोबत ८ मंत्री होते. माझ्या ५० सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. कुणी म्हणाल आमच्या सोबत १५ -२० आमदार आहेत, मी म्हणालो सांगा कोण आहेत ते. माझ्याकडे ५० जण असलेल्या मला मुख्यमंत्रिपद दिले. त्याबद्दल मी नरेंद्र मोदी, अमित शाह, यांना धन्यवाद देतो असे शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिक असलेल्या सार्वभौमत्व सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी आपण विराजमान झाला आहात. राज्यातील गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण अबाधित राहील. आपण न्यायदान करता कायद्यासमोर सर्व समान तत्वाने काम कराल अपेक्षा. राज्याचा कारभार पारदर्शकपणे चालवायचा आहे. प्रसंगी आपण मुक्तपणे निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com