Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र भवनासाठी श्रीनगरला जागा द्या; मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती

महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगरला जागा द्या; मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

जम्मू आणि काश्मीरची (Jammu and Kashmir) राजधानी श्रीनगर (Srinagar) येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी (दि.११) जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री काश्मीर दौऱ्यावर असून येथे त्यांनी सिन्हा (Manoj Sinha) यांची भेट घेत जागेच्या मागणीचे पत्र दिले…

- Advertisement -

पर्यटनाचे (Tourism) महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे..

जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल. महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास कश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकारतर्फे बांधण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पत्रात दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या