Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी

संजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष नाव (Shivsena) आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिले आहे. त्यानंतर आता त्याचे पडसाद अंतर्गत राजकारणावर उमटताना दिसत असून शिवसेनेने (शिंदे गट) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे…

- Advertisement -

भाजपशी पुन्हा युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

शिंदे गटाने संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला होता. तसेच त्याआधी गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, १८ वर्षांनंतरही…

दरम्यान, शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची फेब्रुवारी महिन्यात मुंबईत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव २१ फेब्रुवारीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर याबाबतची अधिकृत माहिती आज (२३ मार्च) लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली होती. त्यानुसार,आज ही निवड करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या